Vivo X Fold 3 Pro सेल सुरु, 50MP + 50MP + 64MP कॅमेरा असणाऱ्या फोनवर मिळवा 15 हजरांचा डिस्काउंट

3 Min Read
Vivo x fold 3 pro sale discount india
Vivo x fold 3 pro sale discount india

Vivo X Fold 3 Pro ची भारतात किंमत: Vivo च्या पहिल्या फोल्डिंग फोनची भारतात विक्री सुरू झाली आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरून आकर्षक ऑफर्ससह खरेदी करू शकता. Vivo चा हा फोन सर्वात कमी जाडीचा फोल्डिंग फोन आहे. यामध्ये ड्युअल फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहेत. यासोबत फोनमध्ये दोन 32MP सेल्फी कॅमेरे आहेत. त्यामुळेच सेल्फीसाठी सुद्धा चांगला कॅमेरा असणारा हा विवोचा एकमेव फोन आहे.

Vivo ने नुकताच भारतात आपला पहिला फोल्डिंग फोन X Fold 3 Pro लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तुम्ही हा फोन Flipkart आणि Amazon या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकाल. फोल्डिंग फोन मधील हा सर्वात कमी जाडीचा स्मार्टफोन आहे. 

Vivo X Fold 3 Pro ची स्पर्धा Samsung Galaxy Z Fold 5 आणि OnePlus Open शी आहे. Vivo X Fold 3 Pro मध्ये उत्कृष्ट कॅमेरा, उत्कृष्ट डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसर आहे. या फोनची किंमत आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घ्या…

Vivo X Fold3 Pro किंमत

Vivo ने Vivo X Fold 3 Pro फोन एकाच कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. 16GB रॅम + 512GB स्टोरेज असलेल्या या वेरिएंटची किंमत 1,59,999 रुपये आहे. कंपनीने यासाठी दुसरा कोणताही पर्याय लॉन्च केलेला नाही. या फोनच्या खरेदीवर HDFC आणि SBI कार्डांवर 15 हजार रुपयांची सूट मिळते आहे. याबरोबरच तुम्हाला 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. हा फोन सेलेस्टियल ब्लॅक कलर या एकाच रंग पर्यायात आहे. तुम्ही हा फोन EMI वर देखील खरेदी करू शकता.

🔥 हेही वाचा 👉 Redmi चा 5G स्मार्टफोन पहिल्यांदाच मिळतोय इतक्या स्वस्तात, ऑफर बद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Vivo X Fold3 Pro वैशिष्ट्य 

विवो  कव्हर स्क्रीनवर 6.53-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. दोन्ही स्क्रीन अल्ट्रा थिन ग्लास आणि आर्मर ग्लास कोटिंगसह येतात. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरवर काम करतो. यात 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो, ज्याचा प्राथमिक सेन्सर 50MP आहे. याशिवाय 50MP वाइड अँगल लेन्स आणि 64MP टेलिफोटो लेन्स उपलब्ध आहेत. कंपनीने सेल्फीसाठी 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. 32MP फ्रंट कॅमेरा मुख्य स्क्रीन आणि कव्हर स्क्रीनवर उपलब्ध आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, 5700mAh बॅटरी दिलेली आहे, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या फोनमध्ये तुम्हाला दोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतात.

Share This Article