OnePlus 12 ची किमत झाली खूपच कमी, हीच आहे फ्लॅगशिप फोन स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी

3 Min Read
oneplus 12 price cut offer first time cheapest price
oneplus 12 ची भारतात ऑफर किंमत

Oneplus 12 Deals Price in India : तुम्ही जर OnePlus चा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर OnePlus चे प्रीमियम स्मार्टफोन्स खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. सध्या, OnePlus आपल्या ग्राहकांना One Community Sale मध्ये उत्तम डील्स देत आहे. जर तुम्हाला OnePlus लेटेस्ट स्मार्टफोन घ्यायचा असेल तर सध्या चालू असलेल्या OnePlus 12 बंपर डिस्काउंट ऑफर चा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणी याद्वारे वनप्लस स्मार्टफोन तुम्हाला खूप कमी किंमतीत मिळेल.

OnePlus स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला OnePlus स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर सध्या खरेदीची उत्तम संधी आहे. OnePlus च्या अनेक स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. जर तुम्हाला प्रीमियम आणि चांगला परफॉर्मन्स असणारा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही OnePlus 12  सिलेक्ट करू शकता. सध्या Oneplus 12 वर एक अतिशय उत्तम ऑफर चालू आहे. 

सध्या वन कम्युनिटी सेल सुरू आहे आणि या सेलमध्ये अनेक फोनवर जबरदस्त डील्स ऑफर केल्या जात आहेत.  OnePlus 12 हा कंपनीचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. OnePlus ने डिसेंबर 2023 मध्ये OnePlus 12 लाँच केला होता. कंपनीने या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आणि 1TB पर्यंत स्टोरेज दिले आहे.  

OnePlus च्या नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोनवर सुपर डील

OnePlus 12 प्रीमियम स्मार्टफोनच्या श्रेणीमध्ये येतो. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना OnePlus 12 स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी देत ​​आहे. लॉन्च होऊन अवघ्या 6 महिन्यातच या फोनची किंमत जवळपास 9 हजार रुपयांनी कमी झाली आहे. OnePlus 12 च्या ऑफर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या…

OnePlus 12 चा 512GB व्हेरिएंट ई-कॉमर्स वेबसाइट Flickart वर 69,999 रुपयांमध्ये लिस्ट आहे. परंतु कंपनी आपल्या ग्राहकांना यावर 13% पेक्षा जास्त डिस्काउंट देत आहे. या सवलतीच्या ऑफरसह, तुम्ही OnePlus 12 फक्त Rs 60,631 या किमतीत खरेदी करू शकता. 

जर तुमचे बजेट कमी असेल तर फ्लिपकार्ट ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देत ​​आहे. तुम्ही OnePlus फक्त 10,106 रुपये प्रति महिना किमतीत खरेदी करू शकता. तुम्ही हा स्मार्टफोन Flipkart Axis Bank कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 5% चा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. 

जाणून घ्या OnePlus 12 ची वैशिष्ट्ये 

  • OnePlus 12 मध्ये 6.82 इंचाचा मोठा डिस्प्ले आहे. 
  • OnePlus 12 च्या डिस्प्लेमध्ये LTPO AMOLED डिस्प्ले पॅनल आहे. यासह, यात 120Hz, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 4500 nits चा पीक ब्राइटनेस आहे. 
  • OnePlus 12 आउट ऑफ द बॉक्स, हा स्मार्टफोन Android 14 वर चालतो. 
  • OnePlus 12 मधील प्रेवसससिंगसाठी कंपनीने या फोनमध्ये 4nm आधारित स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर दिला आहे. 
  • OnePlus 12 मध्ये 1TB पर्यंत स्टोरेज आणि 16GB चा पॉवरफुल RAM दिला आहे. 
  • स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50+64+48 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. 
  • यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. 
  • OnePlus 12 मध्ये 5400mAh बॅटरी आहे जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Share This Article