घरबसल्या X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून असे कमवा लाखो रुपये

2 Min Read
Earn lakhs from x social media platform
Earn lakhs from x social media platform

आपण आतापर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (Twitter) चा वापर फक्त मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी केला असाल. आज आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे आपण YouTube आणि Instagram सारखे X वर सुद्धा पैसे कमवू शकाल.

Earning from X

X सोशल नेटवर्किंगचा वापर जास्तीत जास्त लोक मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणे यासाठीच करतात पण बरेच वापरकर्ते X चा वापर करून पैसे देखील कमावतात. आज आपण X मधून पैसे कमवण्याच्या मार्गांबद्दल बोलणार आहोत.

X चे एड-रेवेन्यू शेयरिंग फीचर काय आहे?

गेल्या वर्षी, एलोन मस्कने X वापरकर्त्यांसाठी एक नवीन एड-रेवेन्यू शेयरिंग फीचर आणला होता, ज्याच्या मदतीने X वर ब्लू टिक असलेल्या वापरकर्त्यांना त्यांच्या पोस्टसाठी पैसे मिळू शकतात. जेव्हा एखादा कंटेन्ट क्रीयेटर काहीतरी फोटो, व्हिडीओ पोस्ट करतो तेव्हा त्यावर जाहिराती दर्शविल्या जातात आणि त्याद्वारे कंटेन्ट क्रीयेटरना पैसे मिळतात. जेवढे जास्त व्ह्यू तेवढ्या जास्त जाहिराती आणि तेवढेच जास्त पैसे कमावता येतात.

काय आहेत नियम आणी अटी?

ट्विटरने ॲड रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्राम अंतर्गत काही नियम केले आहेत, ज्याचे पालन केल्यानंतरच युजरला पैसे मिळतात:

1. ब्लू टिक असणे आवश्यक: ही पात्रतेची प्राथमिक अट आहे.

2. इंप्रेशन्स: निर्मात्यांच्या मागील 3 महिन्यांत त्यांच्या पोस्टवर किमान 15 दशलक्ष इंप्रेशन्स असणे आवश्यक आहे.

3. फॉलोअर्स: किमान ५०० फॉलोअर्स असावेत.

4. वय: निर्मात्याचे वय 18 वर्षे असावे.

याप्रमाणे अर्ज करा

आपण या सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्यास, तुम्ही X ॲप किंवा वेबसाइटवरील अकाउंटच्या सेटिंग्जमध्ये जाऊन मोनेटाइजेशन ऑप्शनमध्ये क्रिएटर सब्सक्रिप्शन सोबत एड रेवेन्यू शेयरिंगसाठी अर्ज करू शकता.

🔴 हेही वाचा 👉 एका फोनमध्ये 2 सिम वापरणे पडणार महागात, जाणून घ्या काय आहे TRAI चा नवा नियम.

X वरून जास्तीत जास्त पैसे कसे कमवावे?

X वरून जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त फॉलोअर्स बनवावे लागतील. त्यामुळे तुम्ही केलेल्या पोस्टवर जास्त ऍड इंप्रेशन्स येतील आणि तुम्ही X द्वारे जास्तीत जास्त पैसे कमावू शकाल.

X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पैसे कमावणे सोपे आहे जर तुम्ही या अटी आणि शर्तींचे पालन केले तर. आता घरबसल्या लाखो रुपये कमवण्यासाठी X वर आपला कंटेन्ट शेअर करा आणि जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमवा.

Share This Article