एका फोनमध्ये 2 सिम वापरणे पडणार महागात, जाणून घ्या काय आहे TRAI चा नवा नियम

2 Min Read
Trai new rule dual sim users
Trai new rule for dual sim users

तुम्ही जर एकाच फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरत असाल तर ही बातमी वाचणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ट्रायने दोन सिमबाबत नवीन नियम केला आहे. एका फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरणाऱ्यांवर दंड आकारण्यात येणार आहे. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या…

तुम्ही जर एकाच फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरत असाल तर ही बातमी वाचणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने दोन सिम संदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. एकाच फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरणाऱ्यांवर ट्राय दंड आकारणार आहे. मोबाईल नंबरचा गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. यामुळे फोनमध्ये दोन सिम वापरत असाल तर काळजी घ्या..

TRAI चा नवीन नियम

ET च्या एका नवीन अहवालानुसार ट्राय लवकरच सिम कार्ड नियम बदलू शकते. ट्रायचे म्हणणे आहे की जर कोणी कोणत्याही गरजेशिवाय फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरत असेल तर त्याच्याकडून अतिरिक्त शुल्क घेतले पाहिजे. हे शुल्क मासिक किंवा वार्षिक असू शकते.

म्हणजेच जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये दोन सिम वापरत असाल तर तुम्हाला लवकरच अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. ट्रायच्या आकडेवारीनुसार, सध्या 219 दशलक्षाहून अधिक मोबाइल नंबर बऱ्याच काळापासून बंद आहेत. हे मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

🔴 हेही वाचा 👉 Redmi चा 5G स्मार्टफोन पहिल्यांदाच मिळतोय इतक्या स्वस्तात, ऑफर बद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

जागतिक पातळीवरील नियम

ट्रायच्या म्हणण्यानुसार अनेक लोक गरज नसताना दोन सिमकार्ड वापरतात. जर लोकांनी एकच सिम ठेवले तर टेलिकॉम कंपन्यांना नंबरची कमतरता भासणार नाही. जगातील अनेक देशांमध्ये एका सिमकार्डचा नियम लागू आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बेल्जियम, फिनलंड, ब्रिटन, लिथुआनिया, ग्रीस, हाँगकाँग, बल्गेरिया, कुवेत, नेदरलँड, स्वित्झर्लंड, पोलंड, डेन्मार्क या देशांचा समावेश आहे. आणी आता भारतात देखील लवकरच हा नवीन नियम लागू केला जाण्याची शक्यता आहे. हा नियम लागू झाला तर दोन सिम वापरणाऱ्यांना एक सिम बंद करावे लागणार किंवा त्यांना त्याचे अतिरिक्त पैसे भरावे लागणार.

🔴 हेही वाचा 👉 Xiaomi 14 CIVI किंमत आणी खास वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Share This Article