Xiaomi 14 CiVi किंमत आणि खास वैशिष्ट्ये जाणून घ्या

3 Min Read
Xiaomi 14 civi launch india price features
Xiaomi 14 civi launch india price features

Xiaomi 14 CIVI स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे हा डुअल फ्रंट कॅमेरा सह येतो.  लॉन्चसोबतच फोनची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. Xiaomi 14 CiVi ची j

किंमत आणी वैशिष्ट्ये जाणून घेऊया…

Xiaomi 14 Xiaomi 14 CiVI  लाँच: Xiaomi ने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Xiaomi 14 CIVI लाँच केला आहे. Xiaomi 14 CIVI हा Xiaomi च्या CIVI सिरीजमधील नवीन स्मार्टफोन आहे. Xiaomi 14 CIVI मध्ये 6.55 इंच 1.5K मायक्रो-कर्व AMOLED पॅनेल आहे. Xiaomi चा हा स्मार्टफोन 512 GB पर्यंत स्टोरेजसह 32MP ड्युअल फ्रंट कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

Xiaomi 14 सीरीजमध्ये लॉन्च केलेला हा नवीन स्मार्टफोन क्वालकॉमचा पॉवरफुल प्रोसेसर, उत्कृष्ट दर्जाचा कॅमेरा, कर्व AMOLED डिस्प्ले, 67 वॉट सुपर फास्ट चार्जिंग यासारख्या खास वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन क्रूझ ब्लू, मॅचा ग्रीन आणि शॅडो ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आहे. फोनचे प्री-बुकिंग लॉन्चच्या दिवशी म्हणजे 12 जून 2024 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून सुरू झाली आहे.

Xiaomi 14 CiVi वैशिष्ट्ये

  • डिस्प्ले: Xiaomi च्या या फोनमध्ये 6.5 इंच 1.5K कर्व AMOLED डिस्प्ले असेल. यात 240 Hz टच सॅम्पलिंग रेट, 120 Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे. फोनची स्क्रीन HDR10 Plus आणि Dolby Vision ला सपोर्ट करते. याशिवाय स्क्रीन प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 वापरण्यात आला आहे.
  • प्रोसेसर आणि सॉफ्टवेअरः स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8एस जनरेशन 3 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा फोन Android 14 वर आधारित HyperOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
  • कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस तीन लेन्स देण्यात आले आहेत. यामध्ये प्राथमिक कॅमेरा 50MP लाइट फ्यूजन 800 इमेज सेन्सर आहे, त्यासोबत 50MP टेलिफोटो कॅमेरा सेन्सर आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. फोनच्या समोर दोन 32-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरे आहे.
  • कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये कनेक्टिव्हिटी पर्याय म्हणून 5G, NFC, Wi-Fi 6, GPS, GLONASS आणि USB Type-C पोर्ट आहे. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सपोर्ट आहे.
  • बॅटरी: यात 4700 mAh बॅटरी देण्यात आली आहे. आणी 67 वॅट फास्ट चार्ज सपोर्ट आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे की, 30 मिनिटे चार्ज केल्यानंतर फोनची बॅटरी 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

Xiaomi 14 CIVI किंमत

  • Xiaomi 14 CV स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत भारतात 42,999 रुपये आहे. फोनचा 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 47,999 रुपयांना आहे. हा स्मार्टफोन Xiaomi च्या वेबसाइट, Flipkart, Mi Home स्टोअर्स आणि इतर पार्टनर स्टोअर्सवरून 20 जूनपासून खरेदी करता येईल. लॉन्चसोबतच फोनच्या प्री-ऑर्डरला सुरुवात झाली आहे.
Share This Article