या आगामी 400CC बाइक्स भारतीय बाजारपेठेत घालतील धुमाकूळ, बजाज सुद्धा आहे लिस्ट मध्ये

2 Min Read
Upcoming 400cc bikes india 2024 2025
Upcoming 400cc bikes india 2024 2025

Upcoming 400cc Bikes in India : ट्रायम्फ बजाज ऑटो, आणि केटीएम या वर्षी म्हणजेच 2024 आणि 2025 मध्ये भारतात 400 सीसी मोटरसायकल लॉन्च करणार आहेत अशी बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापैकी काही मॉडेल्सची भारतीय आणि परदेशी रस्त्यांवर चाचणी सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया 2024 आणी 2025 मध्ये भारतात लाँच होणाऱ्या आगामी बाइक्स बद्दल.

ट्रायम्फ थ्रक्सटन 400 सीसी

Triumph Motorcycles च्या Speed ​​400 आणि Scrambler 400X मुळे भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील Triumph Motorcycles ने आपला दबदबा निर्माण केला आहे. कंपनी आता 398 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन असलेली Thruxton 400 ही मोटरसायकल लाँच करणार आहे.

बजाज RS 400

बजाज ऑटोने अलीकडेच पल्सर NS400 Z लाँच केली आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, बजाज आता Pulsar 400cc लाँच करणार आहे, पल्सर 400 सीसी बद्दल अस बोलल जातया की ही गाडी RS 200 ची फेयर्ड 400 cc वर्जन असेल, आणी pulsar 400 cc ची किंमत सुमारे 2 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल.

🔥 हेही वाचा 👉 2024 बजाज पल्सर ns400z ला ही 5 वैशिष्ट्ये बनवतात खास.

KTM 390 Adventure आणि 390 RC

नेक्स्ट जनरेशन KTM 390 RC आधीच परदेशात चाचणी करताना दिसले आहे, परंतु KTM त्याच्या अधिकृत पदार्पणापूर्वी नवीन 390 Adventure लाँच करण्याची शक्यता आहे. रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 ला चॉईस देणे हा त्यांचा उद्देश आहे. याशिवाय 390 RC देखील भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात येणार आहे. या दोन्ही गाडयांना 399 cc लिक्विड-कूल्ड इंजिन असेल जे नवीन 390 ड्यूक मध्ये आहे.

🔴 हेही वाचा 👉 Ola S1X Vs Bajaj Chetak 2901, कोणती इलेक्ट्रिक स्कूटर आहे चांगली, आणी का जाणून घ्या.

Share This Article