Ola S1X Vs Bajaj Chetak 2901, कोणती इलेक्ट्रिक स्कूटर आहे चांगली, आणी का जाणून घ्या

3 Min Read
ola s1x vs bajaj chetak 2901 best electric scooter 2024
ओला एस1एक्स वि बजाज चेतक 2901 बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर 2024

Ola S1X Vs बजाज चेतक 2901 : तुम्ही जर इलेक्ट्रिच स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणी तुम्ही जर Ola S1X आणी नवीन Bajaj Chetak 2901 या दोन्ही इलेक्टिव स्कूटर मधील कोणती चांगली आहे हा विचार करत असाल तर हा लेख तुम्हाला तुच्या शंकचे समाधान करण्यात नक्कीच मदत करेल. हा लेख पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला समजेल की Ola S1X चांगली आहे का नवीन Bajaj Chetak 2901.

भारतीय बाजारपेठेतील वाढलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीमुळे अनेक कंपन्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहेत. नुकतेच बजाज ने नवीन चेतक 2901 लाँच केली आहे. बजाज चेतक ही Ola S1X kWh शी स्पर्धा करते. या दोन्हीपैकी कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये चांगली वैशिष्ट्ये आहेत आणि कोणती गाडी चांगली आहे? दोन्ही गाड्यांची किंमत किती? जाणून घेऊया.

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन ev कंपन्या नव नवीन electric scooter लाँच करत आहेत. Ola S1x 4kWh आणि बजाज चेतक 2901 मध्ये कोणती स्कूटर खरेदी करणे फायदेशीर ठरेल?

किती शक्तिशाली आहेत मोटर आणि बॅटरी?

  • S1X ही Ola ने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात स्वस्त स्कूटर म्हणून लाँच केली आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये बॅटरीचे अनेक पर्याय दिले आहेत. पण येथे आम्ही तुम्हाला Ola च्या 4kWh क्षमतेच्या बॅटरीबद्दल माहिती देत ​​आहोत. या बॅटरीसह या स्कूटरला कमाल 190 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते. आणी या गाडीचा टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटर इतका आहे. ही गाडी 6.5 तासात फुल्ल चार्ज होते. यामध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत.
  • बजाजने चेतक 2901 मॉडेल नुकतेच लॉन्च केले आहे. बजाज चेतक 2901 एका चार्जवर 123 किलोमीटर रेंज देते. ही गाडी फुल्ल चार्ज होण्यासाठी सहा तास लागतात. ही गाडी ताशी 63 किलोमीटर वेगाने चालू शकते. ड्रायव्हिंगसाठी, यात इको आणि स्पोर्ट्स मोड आहेत. चेतक 2901 मध्ये, कंपनी 2.9 kWh क्षमतेची बॅटरी देत आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

  • S1X मध्ये LED लाइट्स, 34 लीटर बूट स्पेस, समोर ट्विन टेलिस्कोपिक सस्पेन्शन, मागील बाजूस ड्युअल शॉक सस्पेन्शन, CBS सह ड्रम ब्रेक, साइड स्टँड अलर्ट, क्रूझ कंट्रोल, फिजिकल की आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
  • बजाज चेतक 2901 मध्ये स्टील बॉडी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एलईडी लाईट्स सारखी वैशिष्ट्ये आहेत.

🔴 हेही वाचा 👉 बजाजने लाँच केली ₹96,000 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जवर 123 किमी पेक्षा जास्त धावेल.

किती आहे किंमत 

  • S1X स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 109999 रुपये आहे, परंतु केंद्र सरकारने दिलेली सबसिडी कमी केल्यानंतर ती 99999 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येते. 
  • चेतक 2901 ची एक्स-शोरूम किंमत 99998 रुपये आहे.

Share This Article