Skoda Kushaq चे सगळ्यात स्वस्त ऑटोमेटिक वेरिएंट लाँच; आता खरेदीसाठी होणार गर्दी

2 Min Read
skoda kushaq onyx automatic launch price specifications
skoda kushaq onyx automatic launch price specifications

स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या लोकप्रिय SUV Kushaq च नवीन एडिशन लॉन्च केल आहे. कंपनीने या SUV ला Kushaq Onyx Automatic (Skoda Kushaq Onyx AT) असे नाव दिले आहे. आणी या गाडीची किंमत देखील खूपच कमी आहे.

स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या लोकप्रिय SUV Kushaq च नवीन एडिशन बाजारात आणल आहे. या SUV ला Kushaq Onyx Automatic (Skoda Kushaq Onyx AT) असे नाव देण्यात आले आहे. कंपनीने 2023 मध्ये Skoda Kushaq चे नवीन प्रकार Onyx लाँच केला होटा. कंपनीचा दावा आहे की नवीन लाँच केलेल मॉडेल हे स्कोडा कुशाकचे सर्वात स्वस्त स्वयंचलित एडिशन आहे. ऑटोमॅटिक ट्रांसमिशनने सुसज्ज असलेल्या Kushaq Onyx च्या नवीन एडिशनमध्ये पॅडल शिफ्टर्स आणि हिल-होल्ड कंट्रोल आहे. एसयूव्हीच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन लाँच झालेल्या Skoda Kushaq Onyx AT ची वैशिष्ट्ये, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया…

Skoda Kushaq Onyx AT ची वैशिष्ट्ये

Kushaq हे Onyx Active आणि Ambition व्हेरियंटमध्ये येते. यात हाय-एंड ॲम्बिशन व्हेरियंटसह क्रिस्टलाइन एलईडी हेडलॅम्पसारखे वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय यात स्टॅटिक कॉर्नरिंग फंक्शन देखील उपलब्ध आहे. मागील बाजूस Kushaq Onyx Edition मध्ये रियर वायपर आणि defogger दिलेले आहेत. यासोबतच यात बी-पिलरवर ‘ऑनिक्स’ बॅजसह ‘टेक्टॉन’ व्हील कव्हर्स देखील आहेत. याशिवाय, एसयूव्हीमध्ये 2-स्पोक स्टीयरिंग व्हील लेदर रॅप्ड आणि क्रोम स्क्रोलर आहे.  यात स्वयंचलित हवामान नियंत्रण, स्कफ प्लेट्सवरील ‘ऑनिक्स’ बॅज तसेच ओनिक्स-थीम असलेली कुशन आणि टेक्सटाईल फ्लोर मॅट्स देखील आहेत.

कशी आहे Skoda Kushaq Onyx AT ची पॉवरट्रेन

Skoda Kushaq Onyx ऑटोमॅटिकच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या SUV मधील पॉवरट्रेन 1.0-लिटर TSI पेट्रोल इंजिन आहे जे जास्तीत जास्त 115bhp पॉवर आणि 178Nm चा पीक टॉर्क देते. एसयूव्हीचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

🔥 हेही वाचा 👉 भारतातील नंबर 1 इलेक्ट्रिक SUV खरेदीवर 1.35 लाख रुपयांपर्यंत सूट, एका चार्जमध्ये धावेल 465 किमी.

Skoda Kushaq Onyx AT ची किंमत

नवीन लाँच केलेली SUV आता Skoda Kushaq लाइनअपमध्ये सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक प्रकार आहे. कंपनीने ही SUV 13.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केली आहे.

Share This Article