भारतात ‘या’ तारखेला लाँच होणार जगातील पहिली सीएनजी मोटारसायकल, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणी किंमत

2 Min Read
First cng motorcycle launch in india July 2024 Price Specifications
First cng motorcycle launch in india July 2024 Price Specifications

मागील काही महिन्यांपासून मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येत होता की बजाज 18 जून 2024 रोजी मोस्ट अवेटेड बजाज सीएनजी मोटरसायकल लॉन्च करेल. मात्र, bikewale.com या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आता कंपनी 17 जुलै 2024 रोजी बजाज सीएनजी मोटरसायकल लाँच करणार आहे. कंपनीने अद्याप लॉन्च होण्यास उशीर होण्याचे कोणतेही कारण सांगितलेले नाही. सीएनजी आणि पेट्रोल दुहेरी-इंधन सेटअप असलेली ही जगातील पहिली मोटरसायकल असेल. चाला तर मग जाणून घेऊया बजाज सीएनजी मोटारसायकल ची संभाव्य वैशिष्ट्ये, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल तपशीलवार माहिती.

🔴 हेही वाचा 👉 Hero Splendor+ XTEC 2.0 खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या 5 महत्त्वाच्या गोष्टी.

बजाज सीएनजी मोटारसायकलची संभाव्य वैशिष्ट्ये

नवीन बजाज सीएनजी मोटरसायकल चाचणी दरम्यान अनेक वेळा दिसून आली आहे. नवीनतम स्पाय शॉट्सनुसार, टेस्टिंग बाईकमध्ये एक मोठी इंधन टाकी आहे जी ही नवीन गाडी दुहेरी इंधन प्रणालीवर चालणार असल्याचे सांगते. या बाईकला 125cc इंजिन दिले जाऊ शकते. आगामी बजाज सीएनजी मोटरसायकलचे चाचणी मॉडेल टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील बाजूस मोनोशॉक आणि डिस्क आणि ड्रम ब्रेक सेटअपसह दिसले. तर सुरक्षेसाठी, कंपनी बाइकमध्ये सिंगल चॅनल एबीएस किंवा कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम देऊ शकते.

इतकी असू शकते बजाज सीएनजी मोटारसायकलची किंमत

बजाजच्या आगामी CNG मोटरसायकलच्या नावाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.  तथापि, बजाजने अलीकडे ब्रुझर हे नाव ट्रेडमार्क केले आहे जे मोटरसायकलचे अधिकृत नाव असू शकते. यापूर्वी बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी एका इव्हेंटमध्ये सांगितले होते, “आगामी सीएनजी मोटरसायकल ही जागतिक स्तरावरील पहिली बाइक असेल, जी ग्राहकांना कमी खर्चात अधिक मायलेज देईल”. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजाज सीएनजी मोटारसायकलची किंमत 80,000 रुपये ते 90,000 रुपये ईतकी असू शकते.

🔴 हेही वाचा 👉 Ola S1X Vs Bajaj Chetak 2901, कोणती इलेक्ट्रिक स्कूटर आहे चांगली, आणी का जाणून घ्या.

Share This Article