तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बजाजने आपल्या गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा नवीन स्वस्त प्रकार लॉन्च केला आहे. कंपनीने याला बजाज चेतक 2901 असे नाव दिले आहे. बजाज चेतक 2901 बद्दल अधिक जाणून घेऊया…
आपण कंपनीच्या डीलरशिपला भेट देऊन किंवा बजाजच्या अधिकृत वेबसाइटवरून चेतक 2901 खरेदी करू शकता. कंपनीचा दावा आहे की चेतक 2901 एका चार्जवर 123Km पर्यंत चालेल. या गाडीची विक्री १५ जूनपासून सुरू होणार आहे. बजाज चेतक 2901च्या या वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 95,998 रुपये आहे.
बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष एरिक वास म्हणाले, “चेतक डीलरशिपवर चेतक 2901 ची शिपमेंट सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. चेतक 2901 ची निर्मिती ग्राहकांना कमी किमतीत चांगली इलेक्ट्रिक स्कूटर देण्यासाठी केली गेली आहे. आणी आता भारतीय बाजारपेठेत त्याची स्पर्धा TVS iQube, Ather Rizzta आणि Ola S1 सारख्या मॉडेल्सशी होईल.
🔴 हेही वाचा 👉 भारतात ‘या’ तारखेला लाँच होणार जगातील पहिली सीएनजी मोटारसायकल, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणी किंमत.
ही नवीन बजाज चेतक 2901 दिसायला पूर्वीच्या चेतक 2901 सारखीच दिसते. कंपनीने याला आधुनिक-रेट्रो लुकही दिला आहे. त्याच्या डिझाइनमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे रंग पर्याय. तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर 5 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता: लाल, पांढरा, काळा, पिवळा आणी निळा या रंगांमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. चेतक 2901 ला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. त्याच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनचे अनेक अलर्ट पाहू शकाल.
तुम्ही त्यात टेकपॅक देखील मिळवू शकता, जे हिल होल्ड, रिव्हर्स, स्पोर्ट आणि इकॉनॉमी मोड, कॉल आणि म्युझिक कंट्रोल, फॉलो मी होम लाईट्स आणि ब्लूटूथ ॲप कनेक्टिव्हिटी यांसारख्या सुविधा देते. कंपनीने यात 2.88kwh चा बॅटरी पॅक दिला आहे. प्रीमियम आणि अर्बन व्हेरियंटपेक्षा हा एक छोटा बॅटरी पॅक आहे. कंपनीचा दावा आहे की हा बॅटरी पॅक एका चार्जवर 123 किमी अंतर कापण्यास सक्षम असेल. ही श्रेणी ARAI प्रमाणित आहे. त्याचा टॉप स्पीड 63 किमी/तास आहे. त्याची किंमत 96,000 रुपये आहे. तर चेतक अर्बनची सुरुवातीची किंमत 1.23 लाख रुपये आणि प्रीमियम किंमत 1.47 लाख रुपये आहे.
🔥 हेही वाचा 👉 Ola S1X Vs Bajaj Chetak 2901, कोणती इलेक्ट्रिक स्कूटर आहे चांगली, आणी का जाणून घ्या.
बजाज चेतक 2901 ची वैशिष्ट्ये
- रेंज आणि बॅटरी: एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 123 किमी पर्यंत धावण्याची क्षमता आहे. यात 2.88kwh चा बॅटरी पॅक दिला आहे.
- डिझाइन: आधुनिक-रेट्रो लुकमध्ये उपलब्ध, आणि 5 रंग पर्याय: लाल, पांढरा, काळा, पिवळा आणि निळा.
- डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर: ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह, ज्यामुळे स्मार्टफोन अलर्ट्स पाहता येतात.
- टेकपॅक: हिल होल्ड, रिव्हर्स मोड, स्पोर्ट आणि इकॉनॉमी मोड, कॉल आणि म्युझिक कंट्रोल, फॉलो मी होम लाईट्स, आणि ब्लूटूथ ॲप कनेक्टिव्हिटी.
- स्पीड: टॉप स्पीड 63 किमी/तास.
- किंमत: ₹95,998 (एक्स-शोरूम).