टाटा लाँच करणार 10 नवीन ईव्ही कार

2 Min Read
Tata motors 10 new electric cars launch 2024 2025
टाटा नवीन ईव्ही कार

Tata Motors लाँच करणार 10 नवीन इलेक्ट्रिक कार

Tata New Ev Car : केवळ टाटा मोटर्सच नाही तर टाटाचे सहयोगी ब्रँड Jaguar Land Rover (JLR) हे देखील 2025 मध्ये त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार्स लाँच करणार आहे. टाटा या वर्षाच्या अखेरीस (Range Rover Ev) रेंज रोव्हर ईव्ही लॉन्च करून पुढच्या वर्षीपासून Range Rover Electric च्या विक्रीस सुरू करणार आहे. 

टाटाने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालात घोषणा केली आहे की टाटा मोटर्स 2025 पर्यंत 10 नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच करणार आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांत अनेक प्रोटोटाइपचे प्रदर्शन केले आहे आणि पुढील वर्षाच्या अखेरीस यापैकी बहुतांश मॉडेल्सचे उत्पादन सुरू करेल अशी अपेक्षा आहे.

टाटा च्या या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये Curvv EV चा समावेश आहे जे या वर्षाच्या शेवटी येणार आहे. यानंतर (Harrier EV) हॅरियर ईव्ही आणि (Safari Ev) सफारी ईव्ही येतील, जे 2025 च्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. कंपनी 2020 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केलेल्या प्रोटोटाइपवर आधारित टाटा सिएरा देखील सादर करेल, तर Avinya मॉडेल देखील पुढील वर्षी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच Tata Tiago EV अजून अपग्रेड केली जाईल, तर Tigor, Nexon आणि Punch EV यांचेसूद्धा सुद्धा नवीन मॉडेल्स येण्याची शक्यता आहे. कमर्शियल मध्ये Tata X-Pres T देखील अपग्रेड केली जाईल. टाटा मोटर्स सध्या विविध स्टँडअलोन डीलरशिपद्वारे ईव्हीची विक्री करत आहे तर येत्या काही महिन्यांत टाटा इव्ही शोरूम ची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

टाटा 2025 मध्ये कर्व्ह चे ICE वर्जन आणेल, जे 2023 ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आले होते, तर हॅरियर आणि सफारी यांचे पेट्रोल वर्जन लवकरच लाइनअपमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे.

टाटा मोटर्स सोबतच जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) देखील 2025 मध्ये त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक मॉडेलचे सादरीकरण करेल. या वर्षाच्या अखेरीस रेंज रोव्हर ईव्ही जगभरात लॉन्च केल्यानंतर पुढच्या वर्षीपासून टाटा रेंज रोव्हर ईव्ही ची विक्री सुरू करणार आहे.

Share This Article