‘हे’ आहेत जून 2024 मध्ये भारतात लाँच होणारे आगामी मोबाईल स्मार्टफोन्स

3 Min Read
Upcoming mobiles in June 2024
Upcoming mobiles in June 2024 | आगामी मोबाईल जून 2024

आगामी मोबाईल जून 2024 : जून 2024 मध्ये अनेक चांगले प्रीमियम आणि मिड-रेंज स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. Vivo, Xiaomi,मोटोरोला असे अनेक ब्रँड जूनमध्ये त्यांचे नवीन मोबाईल फोन लॉन्च करणार आहेत. Vivo भारतात आपला पहिला फोल्डिंग फोन लॉन्च करत आहे, जो 6 जून रोजी लॉन्च होईल. त्याचप्रमाणे, Xiaomi, Honor, Motorola या कंपन्या सुद्धा त्यांचे नवीन मोबाईल लाँच करत आहेत. जून 2024 मध्ये लाँच होणारे आगामी मोबाईल कोणते ते पाहू..

मे महिन्यात Motorola, Poco आणि इतर ब्रँडनी अनेक फोन लॉन्च केले आहेत. तर जूनमध्ये आपल्याला फ्लॅगशिप आणि प्रीमियम मिड रेंज बजेट फोन पाहायला मिळतील. या महिन्यात काही फोल्डिंग फोन देखील लॉन्च केले जाऊ शकतात. 

Vivo, Xiaomi आणि Motorola असे अनेक ब्रँड जूनमध्ये त्यांचे नवीन फोन लॉन्च करणार आहेत. काहींच्या लाँचची तारीख निश्चित झाली आहे आणि काहींबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. 

Upcoming Smartphone in June 2024 | आगामी मोबाईल जून 2024

Vivo

या यादीत पहिले नाव फोल्डिंग फोनचे आहे, जो Vivo घेऊन येत आहे. विवोने हा फोन आधीच चिनी बाजारात लॉन्च केला आहे. भारतात, हा फोन प्रिमियम किंमतीत दमदार फीचर्ससह लाँच होईल. कंपनी हा भारतातील सर्वात पातळ फोल्डिंग फोन असल्याचा दावा करत आहे. हा फोन 6 जून रोजी लाँच होणार आहे.

🔉 हेही वाचा 👉 Vivo X Fold 3 Pro फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च, किंमत आणि खास वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Xiaomi 14 Civi

हा Xiaomi चा पहिला फोन असेल, जो भारतात Civi ब्रँडिंगसह लॉन्च केला जाईल. यात फ्लोटिंग क्वाड Curve डिस्प्ले असेल.  हा फोन आधीच चीनमध्ये लॉन्च झाला आहे. यात 50MP + 12MP + 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आणि 4700mAh बॅटरीसह येतो. हा फोन भारतात 12 जून रोजी लॉन्च होत आहे.

Honor 200 मालिका

Honor ने अलीकडेच चीनमध्ये Honor 200 सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीज मध्ये Honor 200 आणि Honor 200 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनी लवकरच हे फोन भारतात लॉन्च करू शकते. हे मोबाईल्स ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. त्यांची लॉन्चिंग डेट अद्याप समोर आलेली नाही.

Honor Magic 6 Pro

Honor 200 सीरीज व्यतिरिक्त कंपनी भारतात मॅजिक 6 प्रो देखील लॉन्च करू शकते. हे ब्रँडचे प्रीमियम डिव्हाइस आहे, जे आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च केले गेले आहे. मात्र, याच्या लॉन्च डेटबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

Motorola

मोटोरोलाचे अनेक फोन लवकरच लाँच होणार आहेत, कंपनीने अद्याप कोणत्याही स्मार्टफोनच्या लॉन्च तारखेची पुष्टी केलेली नाही. कंपनी लवकरच Motorola Razr 50 सीरीज, Motorola Edge 50 Ultra आणि Moto G85 लॉन्च करू शकते. Razr हा मोटोरोला चा फ्लिप फोन असेल, तर Moto G85 हा मिड-रेंज मोबाईल असेल.

🔴 हेही वाचा 👉 फक्त ₹ 9,999 मध्ये मिळतोय हा जबरदस्त 5G फोन, 20,000 च्या स्मार्टफोनला देतोय टक्कर.

Share This Article