बजाजने आपल्या टू-व्हीलर पोर्टफोलिओमध्ये काही नवीन प्रकार वाढवले आहेत. बजाजने आपल्या लोकप्रिय Pulsar N160 चा नवीन वैरिएंट लाँच केला आहे. याबरोबरच पल्सर 125, 150 आणि Pulsar 220F या वाहनांना देखील नवीन आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह अपग्रेड केले आहे. त्यामुळे या नवीन वाहनांमध्ये आता आपल्यला काही नवे फिचर्स पाहायला मिळतील.
नवीन पल्सर बाइक्सचे फीचर्स
कंपनीने आपल्या लोकप्रिय Pulsar N160 चा नवीन वैरिएंट लाँच केला आहे. सोबतच पल्सर 125, 150 आणि Pulsar 220F देखील नवीन आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह अपग्रेड करण्यात आली आहे. या मॉडेल्सना आता ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळेल. यामध्ये असलेला इन्स्ट्रुमेंट कन्सोल टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनला सपोर्ट करतो. आता नवीन Pulsar N160 शॅम्पेन गोल्ड 33mm USD फोर्क्स सह येईल.
Pulsar N160 वैशिष्ट्ये
Pulsar N160 मध्ये राइडिंगचा अनुभव आणि उत्तम नियंत्रण वाढवण्यासाठी मल्टी राइड मोड उपलब्ध आहेत. यामध्ये रेन, रोड आणि ऑफ-रोड यांचा समावेश आहे. रोड मोड डीफॉल्ट म्हणून सेट केला आहे. हे शहर आणि महामार्गावर नियमित राइडिंगसाठी सर्वात योग्य आहे. ओल्या रस्त्यांसाठी रेन मोड देण्यात आला आहे. यामुळे निसरड्या भूभागावर बाईक चालवणे सोपे होईल आणी यामुळे पावसाळ्यात ब्रेकिंग सिस्टीम देखील चांगले काम करेल. ऑफ-रोड मोड भारदस्त भूभाग आणि खराब रस्त्यांसाठी आहे. खराब रस्त्यावर बाईक चालवण्यासाठी ऑफ-रोड मोड योग्य आहे.
Pulsar N160 ला 164.82cc, ऑइल-कूल्ड इंजिन आहे, जे 8750rpm वर 11.7 kW (16PS) पर्यंत टॉर्क जनरेट करण्यासाठी ट्यून केलेले आहे. ब्रेकिंगसाठी ड्युअल-चॅनल ABS सह, दोन्ही साईड्सना डिस्क ब्रेक दिले जातात. बजाजने आपल्या नवीन Pulsar N160 व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 139,693 रुपये ठेवली आहे.
Pulsar 125 आणि 150 वैशिष्ट्ये
पल्सर 125 च्या कार्बन फायबर सिंगल आणि स्प्लिट सीट व्हेरियंटमध्ये आता पूर्णपणे डिजिटल ब्लूटूथ कन्सोल, यूएसबी चार्जर आणि नवीन ग्राफिक्स मिळतील. Pulsar 150 मध्येही असाच पर्याय उपलब्ध आहे. पल्सर 125 कार्बन फायबर सिंगल सीटची एक्स-शोरूम किंमत 92,883 रुपये आहे. तर पल्सर 150 सिंगल डिस्कची एक्स-शोरूम किंमत 113,696 रुपये आहे.
Pulsar 220F वैशिष्ट्ये
Pulsar 220F मध्ये देखील अनेक प्रीमियम फिचर्स आहेत. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नवीन ग्राफिक्स आणि अधिक प्रगत इन्स्ट्रुमेंट कन्सोलचा समावेश आहे. Pulsar 220F ची एक्स-शोरूम किंमत 141,024 रुपये आहे.
बजाजने आपल्या नवीन पल्सर बाइक्समध्ये अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये दिली आहेत ज्यामुळे राइडिंगचा अनुभव अधिक सुखद आणि सोयीस्कर होईल. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि मल्टी राइड मोडसारख्या फिचर्समुळे या बाइक्स वापरकर्त्यांसाठी आणखी आकर्षक बनतील.