ही आगामी 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही धावेल एका चार्जवर 600 किमी, बाकी कंपन्यांची झाली हवा टाईट

2 Min Read
2024 Best Upcoming 7 seater electric suv volvo ex90 price specifications
2024 Best Upcoming 7 seater electric suv volvo ex90 price specifications

Upcoming Electric SUV 7 Seater : तुम्ही जर 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल आणी चांगली इलेक्ट्रिक एसयूव्ही शोधात असाल तर एकदा या e suv बद्दल जाणून घ्या. ही पॉवरफुल 7-सीटर इलेक्ट्रिक SUV एका चार्जवर 600 किमीची रेंज देते.

भारतात Volvo EX90 इलेक्ट्रिक SUV चे उत्पादन सुरू झाले आहे. व्होल्वोने जाहीर केले आहे की दक्षिण कॅरोलिना येथील उत्पादन प्रकल्पाने आता ब्रँडची नवीन इलेक्ट्रिक फ्लॅगशिप SUV, EX90 चे उत्पादन सुरू केले आहे. ग्राहकांना त्याची पहिली डिलिव्हरी वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत देण्याचे नियोजित आहे. ही कार भारतासह जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लॉन्च केली जाईल. चाला तर मग जाणून घेऊया Volvo च्या पॉवरफुल 7-सीटर इलेक्ट्रिक SUV EX90 बद्दल…

युनायटेड स्टेट्समध्ये व्होल्वोचा पहिला उत्पादन कारखाना 2018 मध्ये उघडला गेला होता. तिथे सध्या EX90 आणी S60 सेडानचे उत्पादन होते. हा प्लांट दरवर्षी 150,000 कार बनवू शकतो. EX90 व्होल्वोच्या बॉर्न-इलेक्ट्रिक ईव्ही तंत्रज्ञान बेसवर आधारित आहे. EX90 मध्ये 600 किमी रेंज मिळणार आहे.

EX90 त्याच्या एंट्री-लेव्हल व्हेरिएंट EX30 सोबत भारतात विकली जाणार असल्याची Volvo India ने पुष्टी केली आहे. सध्या XC40 रिचार्ज आणि C40 रिचार्ज हे दोन इलेक्ट्रिक मॉडेल्स विक्रीसाठी आहेत.

🔥 हेही वाचा 👉 Ola S1X Vs Bajaj Chetak 2901, कोणती इलेक्ट्रिक स्कूटर आहे चांगली, आणी का जाणून घ्या.

Volvo ची आगामी 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही

7-सीटर EX90 चा टॉप व्हेरिएंट 111kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे, जो एका चार्जवर 600 किमीची रेंज देईल. बॅटरी पॅक दोन इलेक्ट्रिक मोटर्सला पॉवर देते, जे 500bhp पॉवर आणि 900Nm पीक टॉर्क जनरेट करतात.

तर, एंट्री-लेव्हल EX30, ट्विन मोटर सेटअप आणी 69kWh बॅटरी पॅकसह येईल. या E suv EX30 ची एका चार्जवर 474 किमी रेंज असेल .

Share This Article