2024 बजाज पल्सर ns400z वैशिष्ट्ये : बजाज ऑटोने अलीकडेच नवीन पल्सर NS400Z लाँच केली आहे. बजाजच्या पल्सर लाइनअपमधील ही फ्लॅगशिप मोटरसायकल आहे. या मोटारसायकलची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. सध्या दुचाकी मार्केटमध्ये या नवीन 2024 Bajaj Pulsar NS400Z ला मोठी मागणी आहे. Pulsar NS400Z ची एक्स-शोरूम किंमत 1.85 लाख रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 गोष्टींबद्दल ज्या बनवतात 2024 बजाज पल्सर ns400z ला बनवतात खास.
पॉवरफुल इंजिन आणि गिअरबॉक्स
Pulsar NS400Z मध्ये तेच 373 cc युनिट आहे जे डोमिनार 400 आणी आधीच्या KTM 390 Duke मध्ये वापरले गेले होते. हे 8,800 rpm वर 39.5 bhp आणि 6,500 rpm वर 35 Nm उत्पन्न करते. बजाज पल्सर ns400z मध्ये 6-स्पीड युनिट गिअरबॉक्स आहे.
सॉलिड हार्डवेअर
NS400Z एक परिमिती फ्रेम वापरते, समोर 43 मिमी अपसाइड डाउन फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक आहे. या गाडीला दोन्ही बाजूना डिस्क ब्रेक आहे.
अपग्रेडेड रचना
पल्सर NS400Z ची रचना इतर पल्सरसारखीच आहे. समोर, एक नवीन हेडलॅम्प आहे, ज्यामध्ये आता प्रोजेक्टिंग सेटअपसह लाइटनिंग बोल्ट एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प आहेत. यात लो-स्लंग हेडलॅम्प, टँक आच्छादन असलेली मस्क्यूलर इंधन टाकी आणि सध्याच्या पल्सरवर आहे तश्याच टेल लॅम्प डिझाइनसह मागील भाग स्लिम आहे.
आकर्षक वैशिष्ट्ये
बजाज पल्सर ns400z मध्ये एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, सोबतच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते आणि ऑल-एलईडी लाइटिंग आणि ड्युअल-चॅनल एबीएस देखील आहे. याशिवाय, NS400Z मध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, राइड-बाय-वायर, ABS मोड आणि राइडिंग मोड देखील आहेत.
किंमत
Pulsar NS400Z ची सध्या एक्स-शोरूम किंमत 1.85 लाख रुपये आहे. भारतीय बाजारपेठेत पल्सर ns400z चा थेट प्रतिस्पर्धी नसला तरी पल्सर ns400z ही KTM Duke 390 शी स्पर्धा करते.