Hero Splendor+ XTEC 2.0 खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या 5 महत्त्वाच्या गोष्टी

2 Min Read
Important Things To Know Before Buying Hero Splendor+ XTEC 2.0
Important Things To Know Before Buying Hero Splendor+ XTEC 2.0

जर तुम्ही Hero Splendor+ XTEC 2.0 खरेदी करण्याच्च विचार करत असाल तर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. 

भारतात Hero Splendor लाँच होऊन 30 वर्षांचा काळ लोटला आहे, Hero Splendor 1994 पासून भारतीय बाजारपेठेत आहे. स्प्लेंडर चा देखभाल खर्च कमी, गाडीला असणारे जास्त मायलेज यामुळे स्प्लेंडरला मोठी पसंदी आहे. कंपनीने नुकतेच Hero Splendor + XTEC 2.0 नावाचे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. त्याबद्दलच्या 5 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…

  • Hero Splendor+ XTEC 2.0: दिसायला कशी आहे 

कंपनीने नवीन Splendor + XTEC 2.0 चे डिझायन पूर्वीच्या स्प्लेंडर सारखेच ठेवले आहे. मात्र लुक मध्ये काही चांगले बदल देखील केले आहेत. आता नवीन स्प्लेंडर मध्ये एलईडी दिवे सह आयताकृती हेडलॅम्प आहे. हिरोने टेल लॅम्पचीही पुनर्रचना केली आहे, तो आता एच आकाराचा आहे. Splendor+ XTEC 2.0 मॅट ग्रे, ग्लॉस ब्लॅक आणि ग्लॉस रेड या तीन ड्युअल-टोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

  • Hero Splendor+ XTEC 2.0: तपशील

या बाइकला ट्यूबलर डबल क्रॅडल फ्रेम आहे. सस्पेन्शनसाठी, समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऍब्जॉर्बर्स देण्यात आले आहेत. तर गाडीला दोन्ही ड्रम ब्रेक आहेत.

  • Hero Splendor+ XTEC 2.0: वैशिष्ट्ये

Hero Splendor+ XTEC 2.0 च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर, Splendor + मध्ये एक नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे जो इको-इंडिकेटर, रिअल-टाइम इंधन सरासरी, सर्व्हिस रिमाइंडर आणि साइड स्टँड इंडिकेटर यासारखी आधुनिक माहिती पुरवतो. याशिवाय, Hero कॉल, एसएमएस आणि बॅटरी अलर्टसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील देत आहे.

  • Hero Splendor+ XTEC 2.0: इंजिन आणि मायलेज

2024 हिरो स्प्लेंडर + गाडीला 4-स्पीड गिअरबॉक्स आहे. हिरो कंपनीचा दावा आहे की New Hero Splendor+ XTEC 2.0 ही गाडी 73 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.

  • Hero Splendor+ XTEC 2.0: किंमत

Splendor + XTEC 2.0 ची किंमत ₹ 82,911 (एक्स-शोरूम, दिल्ली) ईतकी आहे. (विविध शहरांनुसार गाडीच्या किंमतीत थोडाफार बदल असतो).

Share This Article