जर आपण नवीन कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वाधिक कार विकणारी कंपनी सध्या कार खरेदीवर 57,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे आपण या संधीचा लाभ घेऊ शकता.
भारतात सर्वाधिक कार विकणाऱ्या मारुती सुझुकीने हॅचबॅक सेगमेंटमध्ये वर्चस्व कायम ठेवले आहे. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी बलेनो, मारुती सुझुकी स्विफ्ट, मारुती सुझुकी अल्टो K10 आणि मारुती सुझुकी सेलेरियो सारख्या कारचा समावेश आहे. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी जून महिन्यात मारुती सुझुकी सेलेरियोवर 57,000 रुपयांपर्यंत कमाल सूट देत आहे. मारुती सेलेरियोच्या CNG व्हेरियंटवर 47,000 रुपये, मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंटवर 52,000 रुपये आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंटवर 57,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट देखील समाविष्ट आहे. मारुती सुझुकी सेलेरियोची विक्री, पॉवरट्रेन, फीचर्स आणि किंमत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
मारुती सुझुकी सेलेरियो सवलतीचे संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या
जून महिन्यात मारुती सुझुकी सेलेरियोच्या CNG वेरिएंटवर 30,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 2,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, मारुती सुझुकी सेलेरियो मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंटवर 35,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 2,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. आणी मारुती सुझुकी सेलेरियोच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंटवर 40,000 रुपयांची रोख सूट, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 2,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो पॉवरट्रेन
मारुती सुझुकी सेलेरियोमध्ये 1.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 67bhp ची कमाल पॉवर आणि 89Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.या कारमध्ये CNG पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे जो कमाल 56.7bhp पॉवर आणि 82Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. मारुती सुझुकी सेलेरियोच्या सीएनजी व्हेरियंटमध्ये 35.6 किलोमीटर प्रति लिटर कमाल मायलेज देण्याचा कंपनीचा दावा आहे. मारुती सुझुकी सेलेरियोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख ते 7.09 लाख रुपयांपर्यंत आहे.