iPhone 15 Software Update: Apple ने एक मोठी घोषणा करून अखेरीस आपल्या iPhones च्या सॉफ्टवेअर अपडेट्सच्या अंतिम मुदतीबाबतची माहिती दिली आहे. त्याचा तपशील जाणून घेऊया.
Apple ने iPhone वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने शेवटी आपल्या iPhones साठी किमान सॉफ्टवेअर सपोर्ट विंडो सेट केली आहे. म्हणजेच आयफोनला किती वर्षांसाठी अपडेट्स मिळतील हे निश्चित करण्यात आले आहे. यूकेच्या नवीन नियमनाला प्रतिसाद म्हणून कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
Apple कंपनीने ठरवले आहे की आयफोन 15 सीरीजला किमान 5 वर्षांसाठी सपोर्ट मिळेल. याचा अर्थ असा की आयफोन 15 असो किंवा आयफोन 15 प्रो मॅक्स, Apple 15 सिरीजच्या वापरकर्त्यांना 5 वर्षांसाठी नियमित अपडेट आणि सुरक्षा पॅच मिळत राहतील.
Android फोनला मिळतात 7 वर्षांपर्यंत अपडेट
अँड्रॉइड स्मार्टफोन उत्पादक अजूनही ऍपलपेक्षा अधिक काळ अपडेट देत आहेत. या यादीत मोजक्याच कंपन्यांची नावे आहेत. सॅमसंग आणि Google त्यांच्या प्रीमियम स्मार्टफोन्सवर 7 वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट देत आहेत. मात्र सॅमसंग सर्व फोनवर 7 वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट देत नाही. ही सुविधा फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजसाठीच असते.
ऍपल आपल्या स्मार्टफोन्ससाठी पूर्वीपासूनच बऱ्याच कालावधीसाठी अपडेट्स देत आहे पण अनेक Android फोन उत्पादक या विषयावर उघडपणे बोलत न्हवते. मात्र आता अलीकडच्या काळात हा ट्रेंड बदलला आहे. आता अँड्रॉईड फोन निर्मात्यांनीही ते सॉफ्टवेअर अपडेट कधी पर्यंत देणार आहेत हे स्पष्ट केले आहे.
5 वर्षांनंतरही मिळू शकतात अपडेट
GSMarena वेबसाईट च्या अहवालानुसार, UK च्या नियमांमुळे Apple ला त्यांचे धोरण स्पष्ट करावे लागले आहे. नवीन नियमांमुळे ॲपलला सांगणे भाग होते की iPhone 15 सीरीजला किमान 5 वर्षांसाठी अपडेट मिळतील. Apple ने जाहीर केल्यानुसार iPhone 15 सीरीजचा किमान अपडेट कालावधी 5 वर्षांचा आहे. मात्र कंपनी कोणत्याही फोनसाठी यापेक्षा जास्त काळ अपडेट देत राहू शकते. Apple ने यापूर्वीही असे केले आहे, अनेक iPhones ना 5 वर्षांहून अधिक काळ अपडेट्स मिळतच आहेत.