सर्वात स्वस्त OnePlus 12 खरेदी करण्याची मोठी संधी, येथे मिळतोय बंपर डिस्काउंट

2 Min Read
oneplus 12 biggest discount offer on this website
oneplus 12 biggest discount offer on this website

OnePlus 12 Discount Offer: स्मार्टफोन कंपनी वनप्लस च्या प्रीमियम स्मार्टफोनना भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे आणि OnePlus च्या कॅमेरा आणी बॅटरी बॅकअपमुळे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता सर्वात कमी किंमतीत OnePlus 12 खरेदी करण्याची एक मोठी संधी आहे.  ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, आता आपल्याला OnePlus 12 11,000 रुपयांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येईल.

सध्या OnePlus कम्युनिटी सेल चालू आहे आणि OnePlus चे अनेक फोन स्वस्तात उपलब्ध आहेत, परंतु OnePlus 12 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट कंपनीच्या वेबसाइट किंवा Amazon ऐवजी Flipkart वर उपलब्ध आहे. अनेक विक्रेते फ्लिपकार्टवर हा फ्लॅगशिप फोन विकत आहेत आणि त्यापैकी एकाने डिव्हाइसची किंमत खूपच कमी ठेवली आहे. मात्र, ही सवलत मर्यादित काळासाठीच दिली जात आहे.

OnePlus 12 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट

जर तुम्ही फ्लिपकार्टवर OnePlus 12 शोधलात तर तुम्हाला दिसेल की अनेक विक्रेते हा फोन वेगवेगळ्या किंमतींवर विकत आहेत. यापैकी एक फोन DirectFromBrand ने फक्त 56,649 रुपयांना लिस्ट केला आहे. आणी ही ऑफर इथेच संपत नाही तर ग्राहकांनी Flipkart Axis क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफरचा लाभ घेतला तर त्यांना OnePlus 12 खरेदी करण्यासाठी फक्त 53,821 रुपये द्यावे लागतील आणि त्यामुळे ग्राहकांची 2,833 रुपयांची अतिरिक्त बचत होईल.

ग्राहकांना काही अन्य बँक कार्डसह पेमेंट करताना विविध सवलती देखील मिळत आहेत आणि फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड ऑफरसह, एकूण 11,178 रुपयांची सूट उपलब्ध आहे. OnePlus फ्लॅगशिप फोनवर मिळालेली ही सर्वात मोठी डील आहे.

OnePlus 12 ची वैशिष्ट्य

OnePlus स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा 2K डिस्प्ले आहे आणि 120Hz रिफ्रेश रेटसह याला TUV Rhineland कडून eye care certificate आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह उत्कृष्ट कार्यप्रदर्शन मिळवतो. मागील पॅनलवर, OIS सह 50MP Sony LYT-808 प्राथमिक लेन्स, 64MP 3X पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 48MP अल्ट्रा-वाइड लेन्ससह तिहेरी कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.

OnePlus 12 मध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे आणि Android 14 वर आधारित सॉफ्टवेअर स्किन उपलब्ध आहे. IP65 रेटिंग असलेल्या या फोनची बॅटरी 5400mAh आहे.

Share This Article