Hyundai Creta आणी Kia Seltos ला पाणी पाजणाऱ्या या SUV वर ₹ 1.80 लाखांची भरगोस सूट

2 Min Read
volkswagen taigun suv discount offer price
volkswagen taigun suv discount offer price

सध्या भारतात एसयूव्ही ची क्रेझ खूपच वाढली आहे. फोर व्हिलर खरेदी करताना लोक एसयूव्ही खरेदी करनेच पसंत करत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कार विक्रीपैकी 50 टक्क्यांहून अधिक वाटा SUV सेगमेंटचा आहे. ग्राहकांमधील एसयूव्हीची वाढलेली क्रेझी लक्षात घेऊनच suv उत्पादक कंपन्या सुद्धा नव नवीन एसयूव्ही मॉडेल्स लाँच करत आहेत. तुम्हीही येत्या काही दिवसांत नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आघाडीची कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगन जून महिन्यात त्यांच्या लोकप्रिय SUV Taigun वर 1.80 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरमध्ये 50,000 रुपयांची रोख सूट, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत समाविष्ट आहे. ही सवलत एयर 2023 फॉक्सवैगन टाइगुन या मॉडेलवर लागू आहे. Volkswagen Tiguan ची वैशिष्ट्ये, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

Volkswagen taigun interior
Image Credit: Volkswagen taigun interi (volkswagen.co.i

Volkswagen Tiguan एसयूव्ही पॉवरट्रेन

आपल्याला यात 2 इंजिनचा पर्याय मिळतो. पहिले 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे जे जास्तीत जास्त 115bhp पॉवर आणि 175Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे तर दुसरे 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे जे 150bhp पॉवर आणि 250Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या एसयूव्हीमध्ये पॉवरफुल इंजिनसोबतच ॲक्टिव्ह सिलेंडर टेक्नॉलॉजीही देण्यात आली आहे. कारचे इंजिन स्वयंचलित आणि मॅन्युअल दोन्ही गिअरबॉक्ससह आहे. सध्या Volkswagen Tiguan ग्राहकांसाठी डायनॅमिक लाइन आणि परफॉर्मन्स लाइन या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Volkswagen Tiguan Offer 2024
Volkswagen Tiguan Offer 2024 (Image Credit: volkswagen.co.in)

Volkswagen Tiguan किंमत

फोक्सवॅगन टिगनच्या आतील भागात 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 8-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्ट कार टेक्नोलॉजी, सनरूफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस एंड्रॉयड आणी एप्पल कारप्ले कनेक्टिविटी सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी, कारमध्ये 6-एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि मागे पार्किंग कॅमेरा आहे. बाजारात, Volkswagen Taigun ची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos आणि Maruti Suzuki Grand Vitara सारख्या SUV शी आहे आणी Volkswagen Taigun ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.70 लाख ते 20 लाख रुपये ईतकी आहे.

Share This Article