‘या’ तारखेला लाँच होणार जगातील पहिली CNG बाईक

2 Min Read
Bajaj first cng bike launch date features
Bajaj first cng bike launch date features

Bajaj CNG बाईक ‘या’ तारखेला होणार लाँच

देशातील आघाडीची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी बजाज जगातील पहिली सीएनजी बाईक घेऊन येत आहे. याबाबत कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे. बजाजची CNG बाईक कधी आणि कोणत्या फीचर्ससह लॉन्च होईल जाणून घ्या…

बजाज CNG बाईक कधी येणार?

जगातील पहिली CNG बाईक बजाज ऑटो तर्फे जुलै महिन्यात लॉन्च केली जाणार आहे. कंपनीने अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. Bajaj ची पहिली CNG बाईक 17 जुलै रोजी लाँच केली जाईल. 

Bajaj CNG बाईक 18 जून 2024 ला लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीकडून आधी देण्यात आली होती. पण त्यानंतर लॉन्चची तारीख बदलून नवीन तारीख 17 जुलै असल्याचे सांगण्यात आले.

बजाजची सीएनजी बाईक लाँच होण्याआधी चाचणी दरम्यान अनेक वेळा पाहिली गेली आहे. लॉन्च करण्यापूर्वी सर्व प्रकारच्या परिस्थितीत बाईकची चाचणी घेण्याची कंपनीची योजना आहे. या कालावधीत काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात.

Bajaj CNG बाईक वैशिष्ट्ये

बजाजच्या सीएनजी बाइकमध्ये एलईडी हेडलाइट, लहान साइड व्ह्यू मिरर, झाकलेली सीएनजी टँक, लांब सिंगल सीट, हँड गार्ड, अलॉय व्हील, फ्रंट डिस्क ब्रेक आणि डिजिटल स्पीडोमीटर यांसारखी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. 

याशिवाय बाइकचे एकापेक्षा जास्त व्हेरियंटही सादर केले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या एंट्री लेव्हल बाईकमध्ये CNG तंत्रज्ञान सादर करू शकते. त्यामुळे त्याचे मायलेज १०० किलोमीटर प्रति किलोपर्यंत असू शकते. पण याबद्दल अधिक योग्य माहिती लॉन्चच्या वेळीच उपलब्ध होईल.

Bajaj CNG बाईक लाँच तारीख

लाँच तारीख: 17 जुलै 2024.

Share This Article