बजाजने बजाज चेतकचे नवीन व्हेरियंट लॉन्च केले आहे. नवीन बजाज चेतकची किंमत 96,000 रुपयांपासून सुरू होते. त्याची रेंज 123 किलोमीटर आहे. आणी ही नवीन चेतक 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
बजाज चेतक ही भारतातील लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक म्हणून ओळखली जाते. FY2024 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या यादीत बजाज चेतक चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचा बाजार हिस्सा 11.31% होता. आता विक्री वाढवण्यासाठी, बजाजने 2024 चेतक चे बेस व्हेरिएंट लॉन्च केले आहे. बजाज चेतकचे नवीन व्हर्जन खूपच स्वस्त आहे. त्याला चेतक 2901 असे म्हणतात. त्याची किंमत 95,998 रुपये (एक्स-शोरूम) आहे. चाला तर मग जाणून घेऊया नवीन बजाज चेतकची खासियत.
बजाजने नवीन चेतक लाल, पांढरा, काळा, लेमन यलो आणि ब्लू या रंगात सादर केली आहे. ही भारतभरातील 500 हून अधिक शोरूममध्ये उपलब्ध असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज १२३ किमी आहे.
🔴 वाचायला विसरू नका 👉 Ola S1X Vs Bajaj Chetak 2901, कोणती इलेक्ट्रिक स्कूटर आहे चांगली, आणी का जाणून घ्या.
बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष एरिक वास म्हणाले, “चेतक डीलरशिपवर चेतक 2901 ची शिपमेंट सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. चेतक 2901 हे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे ज्यांना सध्या स्वस्त किंमतीत मेटल बॉडी इलेक्ट्रिक स्कूटर पाहिजे आहे अशा लोकांसाठी चेतक इव्ही हा एक उत्तम पर्याय आहे.
123 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज
Chetak 2901 पेट्रोल स्कूटरच्या ऑन-रोड किमतीत खरेदी करता येते. चेतक 123 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देते. 15 जूनपासून नवीन चेतक ची विक्री सुरु होणार आहे.