108MP कॅमेरा 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज किंमत फक्त ₹8,999, मोफत स्मार्टवॉच

3 Min Read
itel s24 108mp camera 8gb ram 8999 free smartwatch
itel s24 108mp camera 8gb ram 8999 free smartwatch

Best Phone Under 10000 in 2024: 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन 1,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फ्लॅट डिस्काउंटनंतर, हा फोन तुम्हाला 8,999 रुपयांना मिळेल. आणी विशेष बाब म्हणजे या फोनसोबत स्मार्टवॉच मोफत दिले जात आहे.

जर तुम्ही कॅमेराफोन लव्हर असाल आणी जर तुम्हाला 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. किफायतशीर स्मार्टफोन निर्माता itel पुन्हा एकदा त्याचा 108MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन – itel S24 एका जबरदस्त ऑफरसह खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. यासाठी कंपनी पुन्हा Amazon India वर itel Days सेलसह आली आहे. आजपासून सुरू झालेली ही धमाकेदार विक्री १४ जूनपर्यंत चालणार आहे. या बंपर सेलमध्ये मोठ्या सवलतींसह Itel S24 खरेदी करू शकाल. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन 1,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फ्लॅट डिस्काउंटनंतर, हा फोन तुम्हाला 8,999 रुपयांना मिळू शकतो.

या जबरदस्त ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय ऑप्शन निवडावा लागेल.  कंपनी या फोनवर जवळपास 500 रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोन खरेदी करणाऱ्या यूजर्सना आयकॉन 2 स्मार्टवॉच मोफत मिळणार आहे. 9,400 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह हा Itel फोन तुम्ही खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असते हे लक्षात ठेवा.

🔴 हेही वाचा 👉 करा जिओचा हा छोटा रिचार्ज डेटा कधीच संपणार नाही, मिळेल रोज अनलिमिटेड 5G किंमत आहे खूपच कमी.

itel s24 Amazon Offer
itel s24 Amazon Offer (फोटो: ऍमेझॉन)

🔥 जून 2024 मध्ये लाँच होणारे आगामी स्मार्टफोन.

या 108MP कॅमेरा असलेला Itel फोनमध्ये तुम्हाला 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6 इंच HD+ डिस्प्ले मिळेल.  फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 90Hz च्या रीफ्रेश रेटसह येतो. फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे.  मेमरी फ्यूजन फीचरच्या मदतीने या फोनचा एकूण रॅम 16 GB पर्यंत जातो. कंपनी या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून MediaTek Helio G91 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे.

तसेच यात 108-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह QVGA डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. फोनच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. itel S24 ची बॅटरी 5000mAh आहे. ही बॅटरी 18 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल सांगायचे झाले तर हा फोन Android 13 वर आधारित itel OS 13 वर काम करतो. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी कंपनीने या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा दिले आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.

Share This Article