तुम्ही जर बजेट फ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकताच एक कमी किमतीत दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन लाँच झाला आहे.
जर तुम्हाला बजेट फ्रेंडली आणी नवीन लॉन्च झालेला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की Poco ने Poco M6 लॉन्च केला आहे. कंपनीने Poco M6 मध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप दिला आहे.
भारतातील बजेट आणि मिड-रेंज सेगमेंटमधील लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Poco ने एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Poco ने या स्मार्टफोनमध्ये कमी किमतीत उत्तम फीचर्स दिले आहेत. तुम्हाला जर स्वस्त दरात नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी Poco M6 हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
Poco चा हा नवीन स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये अनेक स्मार्टफोन्सना मागे टाकतोय. यात चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी असून हा फोन जलद चार्जिंगलाही सपोर्ट आहे. Poco M6 Android 14 आधारित OS वर चालतो. Poco M6 बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या…
🔥 हेही वाचा 👉 करा जिओचा हा छोटा रिचार्ज डेटा कधीच संपणार नाही, मिळेल रोज अनलिमिटेड 5G किंमत आहे खूपच कमी.
Poco M6 किंमत
Poco ने Poco M6 दोन प्रकारांमध्ये लाँच केला आहे. पहिला प्रकार 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो तर दुसरा प्रकार 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. कंपनीने 6GB व्हेरिएंटची किंमत 10,700 रुपये ठेवली आहे. तर 8GB व्हेरिएंटची किंमत 12,400 रुपये आहे.
Poco M6 स्पेसिफिकेशन्स
Poco M6 मध्ये, Poco ने IPS LCD पॅनेलसह एक डिस्प्ले दिला आहे ज्याचा आकार 6.79 इंच आहे. त्याचा डिस्प्ले पंच होल डिझाइनसह येतो जो 550 निट्सची कमाल ब्राइटनेस प्रदान करतो. आउट ऑफ द बॉक्स यात Android 14 आहे. फोटोग्राफीसाठी यात 108 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
कंपनीने Poco M6 हे Helio G91 अल्ट्रा चिपसेटसह बाजारात लॉन्च केले आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. Poco ने याला 5030mAh बॅटरी दिली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये मायक्रोएसडी कार्ड देखील सपोर्ट आहे ज्यामुळे तुम्ही त्याची मेमरी वाढवू शकता.
🔴 हेही वाचा 👉 फक्त रु. 2266 मध्ये घरी आना Vivo V30, 50MP सेल्फी कॅमेरा आणी 5000mAh ची मोठी बॅटरी.