स्टँडर्ड अल्ट्रोझ प्रीमियम हॅचबॅकच्या या परफॉरमेंस-केंद्रित वर्जन मध्ये व्हिज्युअल अपग्रेड आणि अधिक शक्तिशाली इंजिन मिळते. Tata Altroz Racer मध्ये 1.2L टर्बोचार्ज केलेले 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 5500 rpm वर 120 PS आणि 1750 rpm आणि 4000 rpm दरम्यान 170 Nm टॉर्क निर्माण करते, हे इंजिन Nexon SUV कॉम्पॅक्ट च्या इंजिन सारखेच आहे.
टाटा मोटर्सने 2023 ऑटो एक्स्पोमध्ये सर्वप्रथम आपली अल्ट्रोझ रेसर सादर केली होती. यानंतर, कंपनीने Bharat Mobility Global Expo 2024 मध्ये देखील ती दाखवली होती. टाटा आता अधिकृतपणे आज म्हणजेच 7 जून 2024 ला Tata Altroz Racer लॉन्च करणार आहे.
Tata Altroz Racer डिझाइन
स्टँडर्ड अल्ट्रोझ प्रीमियम हॅचबॅकच्या या परफॉरमेंस-केंद्रित मॉडेल मध्ये व्हिज्युअल अपग्रेड आणि अधिक शक्तिशाली इंजिन मिळणार आहे. हे मॉडेल 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हीलसह सुसज्ज असेल. तसेच हे मॉडेल एकूण तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. गाडीच्या अलॉय व्हील्सची रचना नेहमीच्या मॉडेलप्रमाणेच असेल.
अल्ट्रोझ रेसर 3990 मिमी लांब, 1755 मिमी रुंद आणि 1523 मिमी उंच आहे, ज्याचा व्हीलबेस 2501 मिमी आहे. हे Hyundai i20 N लाइनशी स्पर्धा करेल आणि किंमतही स्पर्धात्मकच असेल.
वैशिष्ट्ये आणी अंतर्गत रचना
यात वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग मागील बाजूस एअर कंडिशनिंग व्हेंट्स, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 10.25-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे. , 6 एअरबॅग्ज, HUD, 360 डिग्री कॅमेरा सिस्टीम, एअर प्युरिफायर, व्हॉईस ऍक्टिव्हेटेड सनरूफ इ. असेल.
इंजिन आणि परफॉरमेंस
Tata Altroz Racer मध्ये 1.2L टर्बोचार्ज केलेले 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 5500 rpm वर 120 PS आणि 1750 rpm आणि 4000 rpm दरम्यान 170 Nm टॉर्क निर्माण करते, जे Nexon SUV कॉम्पॅक्ट मधील इंजिन सारखेच आहे. आणी हा पॉवरप्लांट 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेला आहे.