Vivo X Fold 3 Pro फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च, किंमत आणि खास वैशिष्ट्ये जाणून घ्या

2 Min Read
vivo x fold 3 pro launch price specifications
vivo x fold 3 pro launch price specifications

Vivo ने गुरुवारी म्हणजेच 6 जून रोजी आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन म्हणून Vivo X Fold 3 Pro भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. वीवोचा हा फोन एप्रिलमध्ये चीनी बाजारात लॉन्च झाला होता. Vivo च्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. X Fold 3 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 8.03 इंच AMOLED इनर डिस्प्ले आहे. Vivo X Fold 3 Pro बद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Vivo X Fold 3 Pro किंमत

Vivo X Fold 3 Pro 16GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची भारतातील किंमत 1,59,999 रुपये आहे. हा फोन सेलेस्टियल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन सध्या Vivo India वेबसाइट, Amazon आणि Flipkart द्वारे प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची विक्री 13 जूनपासून सुरू होणार आहे.

एक प्रास्ताविक ऑफर म्हणून, Vivo HDFC आणि SBI कार्डद्वारे पेमेंटवर रु.15,000 ची कॅशबँक ऑफर देत आहे. खरेदीदार 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि एक वेळ मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट हा ऑप्शन देखील उपलब्ध आहे.

Vivo X Fold 3 Pro वैशिष्ट्ये

Vivo X Fold 3 Pro फोन 6.53 इंच AMOLED कव्हर डिस्प्लेसह येतो, ज्यामध्ये 1,172×2,748 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर काम करतो. Vivo X Fold 3 Pro मध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर आहे. यात 16GB LPDDR5X रॅम आणि 512GB UFS4.0 इनबिल्ट स्टोरेज आहे.

कॅमेरा सेटअपबद्दल बघितले तर, Vivo X Fold 3 Pro मध्ये समोर 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये, या फोनमध्ये 5G, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC, GPS, BeiDou, GLONASS, Galileo, QZSS, NavIC, A-GPS, OTG आणि USB टाइप C पोर्ट आहे. या Vivo X Fold 3 Pro फोनमध्ये 5,700mAh बॅटरी आहे जी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

🔥 Realme च्या 5G फोनवर 3000 रुपयांची मोठी सूट, ऑफर फक्त आजच, Amazon वरून करा बुक.

Share This Article