100दा फेकूनपण ना फुटणारा; Nokia 3210 भारतात लॉन्च, UPI सह अजूनही खास फिचर्स

2 Min Read
Nokia 3210 4g india launch
Nokia 3210 4g india launch

Nokia 3210 4G मोबाईल भारतात लॉन्च झाला आहे. हा कीपॅड असलेला फोन असून यात UPI ची सुविधा आहे. हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. याच्या मागील बाजूस कॅमेरा देखील आहे, जो एलईडी फ्लॅश लाइटसह येतो. हा फोन Amazon India वर 3,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. Nokia 3210 4G मोबाईल च्या फिचर्स बद्दल अधिक माहिती जाणून घ्या…

Nokia 3210 4G हा कीपॅड फोन आहे. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India आणि HMD eStore वर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याची किंमत 3,999 रुपये आहे. कीपॅड फोन असूनही यामध्ये UPI सेवा देखील उपलब्ध आहे.

Nokia 3210 4G या तीन रंगांमध्ये उपलब्ध 

Nokia 3210 4G मध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या 4G फोनच्या मागील पॅनलवर कॅमेरा सेन्सर देखील आहे. हा फोन Scuba Blue, Grunge Black आणी Y2K Gold या तीन रंगात उपलब्ध आहे. 

Nokia 3210 4G प्रीलोडेड ॲप्स

Nokia 3210 4G मोबाईल काही प्रीलोडेड ॲप्ससह येतो. यात यूट्यूब, यूट्यूब शॉर्ट्स, न्यूज आणि गेम्स इत्यादी ॲप्स आहेत. आणी यात कंपनीने क्लासिक गेम (स्नेक गेम) दिला आहे. हा गेम 25 वर्षांपूर्वी खूप लोकप्रिय होता आणि अजूनही बरेच लोक स्नेक गेम खेळतात. 

Nokia 3210 4G तपशील 

Nokia 3210 4G मध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. यात UniSoC T107 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 64MP रॅम आहे. हा फोन S30+ सॉफ्टवेअरवर काम करतो. यात 128MB स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने तुम्ही 32GB पर्यंत याची मेमरी वाढवू शकता. 

नोकिया 3210 4G कॅमेरा 

नोकिया 3210 4G मध्ये 2MP रियर कॅमेरा सेंसर आहे, जो LED फ्लॅश लाइटसह येतो. यात 1,450mAh ची बॅटरी आहे.  नोकिया 3210 4G एकदा फुल्ल चार्ज केल्यावर 9.8 तासांचा टॉकटाइम बॅकअप देतो.

Share This Article