फक्त ₹ 9,999 मध्ये मिळतोय मोटोरोलाचा हा जबरदस्त 5G फोन, 20,000 च्या स्मार्टफोनला देतोय टक्कर

3 Min Read
motorola g34 5g under 10000
10,000 च्या आतील मोबाईल

Motorola G34 5G हा पॉवरफुल स्मार्टफोन Motorola ने या वर्षाच्या सुरुवातीला सादर केला होता. जबरदस्त फिचर्स असून देखील हा मार्केट मधील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. आपण 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत हा 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता.

भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनची मागणी लक्षनीय आहे त्यामुळेच स्मार्टफोन उत्पादक कंपन्यामध्ये मोठी स्पर्धा सुरु आहे. अनेकजण 30-40 हजारांचा स्मार्टफोन खरेदी करण्यापेक्षा 10,000 रुपयांच्या आतील स्मार्टफोन खरेदी करणे पसंद करतात. आपण सुद्धा 10 हजार रुपयांच्या आतील मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Motorola चा नवीन 5G फोन Moto G34 5G हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. इतक्या स्वस्तात असणारा हा स्मार्टफोन फिचर्स आणी परफॉर्मन्स च्या बाबतीत महागड्या स्मार्टफोनला टक्कर देत आहे. आपण Moto G34 5G फक्त 9,999 रुपयांत खरेदी करू शकता. मोटोरोला च्या या फोनमुळे इतर कंपन्यांची अवस्था बिकट झाली आहे.

Motorola G34 5G स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यात अल्ट्रा-प्रीमियम डिझाइन आहे आणि ते वीगन लेदर फिनिश ऑफर करते. यात असणाऱ्या डझनभरहून अधिक 5G बैंड्स VoNR सपोर्ट मुळे आपण सर्वोत्तम 5G स्पीडचा आनंद घेऊ शकता. यात असणाऱ्या Qualcomm प्रोसेसर मुळे चांगला परफॉर्मेंस तर मिळतोच, पण त्याशिवाय यात Android 14 वर बेस्ड सॉफ्टवेयर सुधा आहे.

🔴 हेही वाचा 👉 ₹ 4000 ने स्वस्त झाला Samsung 5G फोन, 6GB RAM, 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी आता फक्त 12999 मध्ये.

फक्त एवढ्या कमी किमतीत Moto G34 5G खरेदी करा

कंपनीच्या वेबसाइटशिवाय, Motorola बजेट फोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून खरेदी केला जाऊ शकतो. त्याच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर, इतर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. Axis Bank, HDFC बँक, ICICI बँक आणि SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना 1000 रुपयांची सूट मिळत आहे.

🔥 लेटेस्ट 👉 हे आहेत जून 2024 मध्ये लाँच होणारे आगामी स्मार्टफोन.

बँक ऑफरसह Moto G34 5G ची किंमत 9,999 रुपये आहे. यासोबतच ग्राहकांनी त्यांचा जुना फोन एक्सचेंग केला तर याची किंमत 8,750 रुपयांपर्यंत होते. कमाल. निवडक मॉडेल्सवर रु.1000 ची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध आहे. हा फोन चारकोल ब्लॅक, आइस ब्लू आणि ओशन ग्रीन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Motorola G34 5G स्पेसिफिकेश 

Motorola फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंच LCD HD+ डिस्प्ले आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर असून 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. IP52 रेटिंग आणि डॉल्बी एटमॉस स्पीकरसह 50MP ड्युअल कॅमेरा आहे. 16MP फ्रंट कॅमेरा असून या स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh आहे.

Share This Article