Motorola Edge 50 Ultra Launch Date in India : स्मार्टफोन उत्पादक कंपनी Motorola भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. मोटोरोलाने या फोनचे नाव जाहीर केले नसले तरी त्याच्या डिझाइन वरून वरून तो Motorola Edge 50 Ultra असल्याचे दिसत आहे.
Motorola लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, कंपनी लवकरच भारतात Motorola Edge 50 Ultra लॉन्च करणार आहे. अलीकडेच कंपनीने हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च केला आहे. Motorola Edge 50 Ultra फोन Edge 50 Pro आणि Edge 50 Fusion सीरीजचा भाग असेल.
कंपनीने अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आगामी स्मार्टफोनचा टीझर रिलीज केला आहे. हा फोन वुडन फिनिश आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. त्याचे तपशील जाणून घेऊया.
Motorola Edge 50 Ultra भारतात कधी लाँच होणार?
Motorola India ने या फोनचा फोटो देखील शेअर केला आहे. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिसत आहे, ज्यामध्ये पेरिस्कोपिक टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने भारतात मोटोरोला एज 50 अल्ट्रा लॉन्चची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. तथापि, वृत्तांनुसार Motorola भारतात जूनमध्ये Motorola Edge 50 Ultra लॉन्च करू शकते.
Motorola Edge 50 Ultra वैशिष्ट्य काय आहेत?
Motorola Edge 50 Ultra मध्ये 6.7-इंचाचा poOLED डिस्प्ले आहे. स्क्रीन 144Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येते. डिस्प्ले 2800 निट्सच्या पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षणासह येतो. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरवर काम करतो.
यात 16GB पर्यंत रॅमचा पर्याय आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याची प्राथमिक लेन्स 50MP आहे. याशिवाय, 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 64MP पेरिस्कोपिक टेलिफोटो कॅमेरा उपलब्ध आहे.
कंपनीने फ्रंटमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. Motorola Edge 50 Ultra मध्ये 4500mAh बॅटरी दिली गेली आहे, जी 125W टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन 50W वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
🔥 हेही वाचा 👉 करा जिओचा हा छोटा रिचार्ज डेटा कधीच संपणार नाही, मिळेल रोज अनलिमिटेड 5G किंमत आहे खूपच कमी.