6000mAh बॅटरी आणि 6GB RAM असलेला 5G फोन; ऑफरमध्ये मिळतोय खूपच स्वस्तात

2 Min Read
iqoo z9x 5g phone 6000mah battery 6gb ram amazon discount offer
iqoo z9x 5g phone 6000mah battery 6gb ram amazon discount offer

5G Phone Amazon Discount: तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात मस्त एक स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आहे. आणी या फोनमध्ये 6GB रॅम आहे. आणी सध्या सुरु असलेल्या ऑफरमुळे हा स्मार्टफोन कमी किंमतीला मिळत आहे.

जर तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि जर तुमचे बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी एक चांगली डील आहे. Amazon वरून आपण फीचर लोडेड iQOO Z9x 5G स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता. हा फोन 6 GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह येतो. iQOO Z9x 5G स्मार्टफोन बद्दल अधिक जाणून घ्या…

iQOO Z9x 5G तपशील

iQOO Z9x 5G स्मार्टफोनला 6.72 इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.  फोनमध्ये 1000 nits पीक ब्राइटनेस आहे. फोन IP64 सर्टिफिकेशन रेटिंगसह येतो. फोन ड्युअल स्टीरिओ स्पीकर सपोर्टसह येतो. हा फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 ला सपोर्ट करतो. हा फोन 2 वर्षांचा Android आणि 3 वर्षांचा सुरक्षा सपोर्टसह येतो. फोन 4nm आधारित Snapdragon 6 Gen 1 चिपसेटवर काम करतो. या फोनमध्ये 6000mAh अल्ट्रा स्लिम बॅटरी आहे. तसेच 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन 30 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो आणि 10 तास वापरता येतो. फोनची जाडी 7.99mm आहे.

iQOO Z9x 5G किंमत आणि ऑफर

iQOO Z9x 5G स्मार्टफोनची किंमत 18,998 रुपये आहे. हा फोन Amazon वर 24 टक्के डिस्काउंटसह 14,499 रुपयांना खरेदी करता येईल. फोनच्या खरेदीवर 11,850 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच, निवडक बँक कार्डांवर 1,449 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. या ऑफरमध्ये फोनची किंमत जवळपास 13 हजार रुपये होते. आणी फोनच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

🔴 हेही वाचा 👉 करा जिओचा हा छोटा रिचार्ज डेटा कधीच संपणार नाही, मिळेल रोज अनलिमिटेड 5G किंमत आहे खूपच कमी.

Share This Article