इंटरनेटशिवाय करता येणार UPI पेमेंट; HMD 105 आणि HMD 110 फीचर फोन लॉन्च, किंमत फक्त ₹999

3 Min Read
hmd 105 and 110 feature phone launch price specifications
hmd 105 and 110 feature phone launch price specifications

तुम्ही जर फीचर फोन खरेदी करणार असाल तर नुकताच लाँच झालेला HMD फीचर फोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. HMD ने आज भारतीय बाजारात दोन नवीन फीचर फोन लाँच केले आहेत. तुम्ही फक्त 999 रुपयांमध्ये HMD 105 खरेदी करू शकता. HMD फीचर फोन च्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या…

HMD 105 आणि HMD 110: इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करणारे फीचर फोन्स लॉन्च, किंमत ₹999

HMD ने आज भारतीय बाजारात दोन नवीन फीचर फोन लाँच केले आहेत, ज्यांची नावे HMD 105 आणि HMD 110 अशी आहेत. या फोन्सचे डिझाइन वेग वेगळे ठेवण्याचा आले आहे. या दोन्ही फोनची खासियत म्हणजे यात बिल्ट इन UPI ​​ॲप्लिकेशनला सपोर्ट आहे. या फोनचा वापर करून तुम्ही इंटरनेटशिवायही UPI पायटमेंट करू शकता.

एचएमडी ग्लोबल व्हीपी इंडिया रवी कुंवर यांनी सांगितले की “एचएमडी 105 आणि एचएमडी 110” हे फोन अतिशय स्टाइलिश आणि नवीन डिझाइनसह आहेत. UPI सेवेसह येणारा हा पहिला फीचर फोन आहे. हा फोन तुम्हाला अतिशय कमी किंमतीला मिळेल. 

 hmd फोनची किंमत

HMD 105 ची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. आणी HMD 110 ची किंमत 1199 रुपये आहे. तुम्ही हा फोन HMD.com, ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअरमधूनही खरेदी करू शकता. 

hmd फोनची वैशिष्ट्ये

जर आपण hmd फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर त्यात hmd फोनमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. आपल्याला एक प्रिमियम डिझाइन पाहायला मिळेल. हा फोन वापरायला अगदी सोपा आहे. या दोन्ही फोनमध्ये बिल्ट इन UPI ​​ॲप्लिकेशन देखील आहे. ज्यामुळे तुम्ही इंटरनेट नसतानाही UPI व्यवहार करू शकता. तुम्हाला HMD 105 आणि HMD 110 मध्ये प्रगत मल्टीमीडिया वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. सोबतच 1 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देखील मिळते. 

या फोन्समध्ये तुम्हाला 1000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 18 दिवसांच्या स्टँडबाय टाइमसह येते. यात MP3 प्लेयर आणि वायरलेस आणि वायर्ड रेडिओसाठी देखील आहे.

मुख्य वैशिष्ट्ये:

  • UPI पेमेंट: इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्याची सोय असलेल्या या दोन्ही फोन्समध्ये बिल्ट-इन UPI ॲप्लिकेशन आहे.
  • बॅटरी: 1000mAh बॅटरीसह येतात, ज्यामुळे 18 दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळतो.
  • मल्टीमीडिया: MP3 प्लेयर, वायरलेस आणि वायर्ड रेडिओसाठी सपोर्ट.
  • किंमत: HMD 105 ची किंमत ₹999 आहे आणि HMD 110 ची किंमत ₹1199 आहे.
  • डिझाइन: प्रिमियम डिझाइनसह सोपा वापर, एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी.

फोनच्या किमती:

  • HMD 105: ₹999
  • HMD 110: ₹1199

तुम्ही हे फोन HMD.com, फ्लिपकार्ट आणि स्थानिक रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता.

Share This Article