नवीन Hero Splendor Plus xtec 2.0 कमी किंमत जास्त मायलेज, आहेत ही खास वैशिष्ट्ये

2 Min Read
New hero-splendor-plus-xtec-2-0-price-mileage-features
New hero-splendor-plus-xtec-2-0-price-mileage-features

Navin Hero Splendor Plus xtec 2.0 : हीरो स्प्लेंडर सिरीज ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल आहे. कंपनी दर महिन्याला या बाईकच्या 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करते. आता कंपनीने नवीन Splendor+ XTEC 2.0 लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक चांगले मायलेज देईल.

देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक Hero MotoCorp ने देशांतर्गत बाजारपेठेत आपली प्रसिद्ध बाइक Hero Splendor XTEC चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने याचे नाव Splendor+ XTEC 2.0 ठेवले आहे. यामध्ये काही  अपडेट्स करण्यात आले आहेत ज्यामुळे ही स्प्लेंडर मागील मॉडेलपेक्षा चांगली आहे. नवीन Splendor+ XTEC 2.0 ची किंमत 82,911 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

नवीन स्प्लेंडरमध्ये काय खास आहे

लुक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने पूर्वीप्रमाणेच क्लासिक डिझाइन दिले आहे. नवीन एलईडी हेडलाईट व्यतिरिक्त त्यात हाय इंटेन्सिटी पोझिशन लॅम्प (HIPL) समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचा अनोखा ‘H’ आकाराचा टेल लॅम्प रात्रीच्या वेळी पूर्वीच्या मॉडेल पेक्षा चांगला प्रकाश देतो. पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर, लांब सीट, आणी यूएसबी चार्जिंग पोर्ट या गाडीला खास बनवतात.

Splendor+ XTEC 2.0 इंजिन आणि कामगिरी

पूर्वीप्रमाणेच कंपनीने नवीन Hero Splendor Plus Xtec 2.0 मध्ये 100cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 7.9 BHP पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. हे आयडियल स्टार्ट/स्टॉक सिस्टम (i3S) ने सुसज्ज आहे. जे बाईकचे मायलेज सुधारण्यास मदत करते. कंपनीचा दावा आहे की या बाईकची रनिंग कॉस्ट कमी असण्यासोबतच गाडीचा मेंटेनन्स देखील खूप आहे. आणी कंपनीचा असा दावा आहे की ही बाईक 73 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देते.

🔴 हेही वाचा 👉 Hero Splendor+ XTEC 2.0 खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या 5 महत्त्वाच्या गोष्टी.

Splendor+ XTEC 2.0 वैशिष्ट्ये  

  • पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर.
  • इकॉनॉमी इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर, बाईक स्टँड इंडिकेटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी.
  • स्मार्टफोन कनेक्ट – एसएमएस, कॉल आणि बॅटरी अलर्ट.
  • हॅझार्ड लाइट विंकर्स, साइड स्टँड इंजिन कट ऑफ.
  • मॅट ग्रे, ग्लॉस ब्लॅक आणि ग्लॉस रेड ड्युअल टोन पेंट.
  • 5 वर्षांपर्यंत किंवा 70,000 किलोमीटरपर्यंत (जे आधी येईल) वॉरंटी.

Share This Article